संवर्धन करूनही ऐतिहासिक वास्तूची अवहेलना
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ऐतिहासिक शहराची ओळख असलेल्या बावन्न दरवाजांपैकी एक असलेल्या रंगीन दरवाजाची योग्य देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरच असलेल्या या पुरातन वास्तूचे नूतनीकरण केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रंग उडाले असून, ही वास्तू अस्वच्छता आणि समाजकंटकांचा अड्डा बनली आहे.
महापालिका, 'इन्टॅक्ट' संघटना आणि शहर वारसा संवर्धन समितीच्या संयुक्त समन्वयातून पडझड झालेल्या या ऐतिहासिक दरवाजाची डागडुजी करण्यात आली होती. या संवर्धनामुळे दरवाजाला गतवैभव प्राप्त झाले होते; मात्र, त्यानंतर प्रशासनाने या वास्तूच्या
देखभालीसाठी कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था केली नाही. परिणामी, सध्या या रंगीन दरवाजाची बिकट अवस्था झाली असून, ऐतिहासिक वारशाच्या या दुर्दशेबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
इ. स. १६५३ ते १६५९ या काळात हा दरवाजा औरंगजेबचा महाल किलेअर्कचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आला होता. हा दरवाजा शहराच्या तटबंधीचा एक महत्वाचा भाग असून, याच्या दोन्ही बाजूंनी मजबूत बुरूज आहेत. त्यावर तोफा ठेवण्यासाठी जागा आहेत. या दरवाजावर सर्व शाही उत्सव रंगीबेरंगी दारूगोळ्याची विशेष आतषबाजी करून साजरे केले जात असत. शहरात झालेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर
मद्यपींचा बनला अड्डा
रंगीन दरवाजा भिकारी तसेच भटक्या लोकांचे आश्रयस्थान बनला आहे. दिवसाही मद्यपींच्या पार्थ्यांसह दरवाजाच्या आवारात अन्नपदार्थ शिजवण्याच्या खानाखुणा दिसून येत आहे. सगळीकडे काचांचा खच, प्लास्टिक, बाटल्या, स्नॅक्सचे रॅपर्स दिसून येत आहे.
सुरक्षारक्षक तैनात करा
५२ दरवाजांपैकी एक असलेल्या रंगीन दरवाजाची दुरवस्था झाली आहे. रंगीन दरवाजातील उपद्रव थांबवण्यासाठी तत्काळ सुरक्षारक्षक तैनात करणे आवश्यक असून, तसे पत्र जिल्हाधिकारी, महापौर यांना देण्यात येऊन त्यांचे लक्ष वेधणार आहोत.
- डॉ. संजय पाईकराव, इतिहास व पुरातत्व अभ्यासक
रंगीन दरवाजाचे भाग्य उजळले होते; परंतु आता रंगीन दरवाजा कचरायुक्त बनला आहे. त्याच्या संवर्धनानंतर समोरील दोन हौदात पाणी सोडून बंद पडलेले कारंजे सुरू करण्यात आले. परंतु, आता या हौदात कचरा आणून टाकला जातो.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














